ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली श्रद्धांजली!

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवरांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ट्वीट करून आदरांजली अर्पण केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबरील छायाचित्र शेअर करीत आठवणींना उजाळा दिला. पुरंदरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांचाही व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी शेअर केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात असे म्हटले आहे की, ‘हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील.’

‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button