breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरून चर्चा

नवी दिल्ली– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून दैनंदिन रुग्णसंख्या तब्बल तीन लाखांच्या पुढे गेली आहे. अशात युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांसारखे अनके देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अमेरिकेनेही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिली आहे. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तसेच मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल जो बायडन यांचे आभारही मानले आहेत.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या कोरोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात येत असलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले. याशिवाय भारताकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.’

दरम्यान, अमेरिकेने भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचे मान्य केले आहे. बायडन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसेच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जो बायडन यांनी सोमवारी ट्विट करत, ‘ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचे ठरवले आहे’, असे म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button