breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींनी शेअर केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत; म्हणाले,…

नवी दिल्ली |

२६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणून तो ‘प्रजासत्ताक दिन’ हे साऱ्यांनाच माहीत असते. परंतु या प्रजासत्ताकाची रूपरेषा ज्या संविधानाने किंवा राज्यघटनेने ठरवली, ते संविधान आपण- भारतीय लोकांनी- ‘अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण’ करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९. आज भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत शेअर केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये या भाषणाच्या प्रतीचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या खास दिवशी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा काही भाग शेअर करत आहे. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत त्यांनी मसुदा समितीपुढे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.

भारतीय राज्यघटनेची रचना अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेचा खर्डा किंवा मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. या घटना समितीने १६६ दिवस काम केले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस एवढा कालावधी लागला. ‘‘घटना समितीने सुचविलेली भारतीय राज्यघटना संमत करावी.’’ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एका ओळीचा प्रस्ताव, विस्तृत चर्चेअंती टाळ्यांच्या गजरात संमत केला गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button