breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंतप्रधान मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन्…’, शिवसेनेतील बंडखोरीवर एकटे छगन भुजबळच स्पष्ट बोलले

मुंबई: शिवसेनेतील बंडखोरीवर आता सरकारमधील अन्य पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेतील अंतर्गत बाब असल्याचे म्हटले होते. आता राष्ट्रवादीचे नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी सकाळी शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीच्या आधी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका घेतील असे वाटत नाही. पण राजकीय पक्षांनी नेहमची निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले असा टोला देखील भुजबळांनी सध्याच्या राज्यातील राजकीय सत्तासंघर्षावर लगावला.

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेल्या या नाट्याला आज मंगळवारी आणखी वेग आला. एकनाथ शिंदे यांनी सकाळी आपल्या सोबत ४५ आमदार असल्याचा दावा केला. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे यांच्या सोबत सकाळीच बोलण झाल्याचे म्हटले होते. पण काही तासातच विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे ट्वीट करत उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. संजय राऊत यांच्या ट्वीटबद्दल विचारले असता छगन भुजबळ यांनी आपण तसे ट्वीट पाहिले नाही, असे उत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button