ताज्या घडामोडीमुंबई

पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून महागाईचा भडका

मुंबई |  महागाईचा भडका अजूनही कायम आहे. आता जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक फटका बसणार आहे. जीवनावश्यक असणाऱ्या पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती वाढणार आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

डायबिटीस, कॅन्सर, हायबीपीची औषधे महागणार आहेत. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून १ एप्रिलपासून औषधांचे दर वाढवण्यात येणार आहेत. आता औषधेही महागणार आहेत. एरवी सर्वांच्या घरात असणाऱ्या पॅरासिटॉमोलचेसुद्धा दर वाढणार आहेत. सोबतच ८०० प्रकारच्या औषधांचे दर वाढणार आहेत. ही दरवाढ १० टक्क्यांनी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेनकिलर अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह इतर आवश्यक औषधांच्या दरवाढीचे संकेत दिले आहेत. ड्रग प्राईसिंग अमेरिकी ऑथॉरिटीने दरवाढीला मंजुरी दिली. एप्रिलपासून दरवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button