breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ; डिझेलचीही शतकाकडे वाटचाल

नवी दिल्ली – देशात आज सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागले, तर पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. डिझेलच्या प्रतिलिटर दरात २५ पैशांची वाढ झाली. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास डिझेलही लवकरच शंभरीपार पोहोचेल, अशी शक्यता आहे. सध्या मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर १०७.२६ रुपये आणि डिझेलसाठी प्रतिलिटर ९६.९३ रुपये मोजावे लागत आहेत, तर दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०१.१९ रुपये आणि ८९.३२ रुपये इतका आहे.

देशात पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. सामान्य नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी समस्येचा सामना करावा लागतोय. मागील चार दिवसांत डिझेल ७० पैशांनी महागले. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या दरात २४ सप्टेंबरला २० पैसे, २६ सप्टेंबरला २५ पैसे आणि आजही २५ पैशांची वाढ केली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात डिझेल ७० पैशांनी महागले आहे, तर पेट्रोलच्या दरांत मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जवळपास १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही आधीच १०० रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठले होते.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, १ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १५-१५ पैसे प्रतिलिटरची कपात करण्यात आली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींत १५-१५ पैशांची घट झाली होती. म्हणजेच या महिन्यात पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ३० पैशांनी स्वस्त झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button