breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दरवाढ सुरूच! पेट्रोल-डिझेल ३५ पैशांनी महागले

मुंबई – ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरू झालेली पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. आज रविवारीही पेट्रोल-डिझेल महागले. दोन्हींचे दर ३५ पैशांनी वाढले. पेट्रोल पंपावरच्या मीटरचे आकडे दररोज जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्याच वेगाने आपला खिसाही रिकामा होत चालला आहे. आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०५.८४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले, तर डिझेलची किंमत आता ९४.५७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे.

ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरात १३ वेळा वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल ३.८५ रुपयांनी, तर डिझेल प्रतिलिटरमागे ४.३५ रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर १११.७७ रुपये इतका असून एका लिटर डिझेलसाठी १०२.५२ रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलिटर दर ११५.७३ रुपये इतका आहे. तसेच राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०५.८४ रुपये आणि ९४.५७ रुपये इतका आहे. दरम्यान, इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलिटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button