ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रुडसेट राष्ट्रीय अकादमीचा वार्षिक अहवाल सादर

पिंपरी चिंचवड | महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वासेकर यांच्या हस्ते रुडसेट राष्ट्रीय अकादमी महाराष्ट्र या संस्थेचा आर्थिक वर्ष 2020-21 साठी ‘अँन्यूअल ऍक्टिव्हिटी रिपोर्ट’ हा वार्षिक अहवाल नुकताच सादर करण्यात आला.कदम आणि बर्वे यांनी एकाच वेळी एसएलबीसी पुणे येथे हा अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी कदम, बर्वे (एसएलबीसी), डायरेक्टर जनरल – एनएआर एन. सत्यमूर्ती, मिशन व्यवस्थापक विशाल जाधव, नियंत्रक मूल्यांकन आणि प्रमाणन आर आर सिंह, एसडीआर एनएसीईआर सुनील कस्तुरे, के पी कश्यप, मूल्यांकन आणि प्रमाणन उपनियंत्रक आलोक मोदी, सहाय्यक नियंत्रक मूल्यांकन आणि प्रमाणन प्रीती पांडे आदी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून उपस्थित होते.

एप्रिल 2009 मध्ये देशभरातील विविध बँकांनी स्थापन केलेल्या रुडसेट इन्स्टिट्यूट आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या क्षमता निर्माण आणि सल्ला देण्याच्या उदयोन्मुख गरजांना प्रतिसाद म्हणून स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर संसाधन संस्था म्हणून काम करत असून उद्योजकता विकास क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्य करते. प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन तसेच स्वतंत्र संघाद्वारे त्यांचे मूल्यांकन आणि प्रमाणित करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button