Mahaenews

पूर्व मोसमी पावसाची राज्यातील वाटचाल सुरू; आठवडय़ाअखेरीस केरळमध्ये

Pre-monsoon rains continue in the state

पूर्व मोसमी पावसाची राज्यातील वाटचाल सुरू

Share On

नागपूर |

केरळमधील मोसमी पावसाचे आगमन आठवडय़ाअखेरीस अपेक्षित असले तरीही महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान, जून महिन्यातील पहिले दहा दिवस नागरिकांना तापमान आणि उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने आतापर्यंत ३१ मे आणि आता ३ जून असा दोनदा मोसमी पावसाचा अंदाज दिला आहे. प्रत्यक्षात आठवडय़ाअखेरीस मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान खात्याने १४ मे रोजी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर के ला होता. यावेळी त्यांनी के रळमध्ये ३१ मे दरम्यान मोसमी पाऊस अपेक्षित असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा तीन जूनच्या आसपास मोसमी पाऊस अपेक्षित असल्याचे खात्याचे म्हणणे आहे. वारंवार बदलणाऱ्या या अंदाजामुळे नागरिकदेखील संभ्रमात आहेत.

प्रत्यक्षात के रळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात या आठवडय़ाच्या अखेरीस अपेक्षित आहे. मोसमी पावसाची प्रगती पश्चिम किनारपट्टीवर (के रळ, कर्नाटक, गोवा आणि कोकण या आतील भागांपेक्षा) वेगाने होईल. गोव्यामध्ये आठ जूनच्या आसपास तर सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणमध्ये दहा जूनच्या आसपास मोसमी पावसाचे आगमन होईल. मुंबईत १० ते १५ जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन अपेक्षित आहे. आठ जूननंतर कोकण आणि मुंबईमध्ये पावसात हळूहळू वाढ होईल. उर्वरित राज्यात १३ जूनच्या आधी मान्सून अपेक्षित नाही, अशीच सध्याची हवामानची स्थिती दर्शवत आहे. चार जूनपर्यंत राज्यात पूर्वमोसमी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी राहील. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत म्हणजेच किमान दहा जूनपर्यंत उकाडा सुरूच राहणार आहे. यादरम्यान विदर्भात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. याकाळात शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कारण या आठवडय़ातील पाऊस हा पूर्व मोसमी वादळी पाऊस असणार आहे. हा पाऊस सगळीकडे सारखा पडत नाही. तापमान मात्र अधिक राहील, असे कळवण्यात आले आहे.

सध्या मोसमी पावसाची क्रि या काहीशी संथ आहे. ज्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये वेळेत मोसमी पाऊस येऊनही के रळमध्ये त्याला वेळ लागत आहे. मात्र, या आठवडय़ाच्या अखेपर्यंत मोसमी पावसाच्या क्रि या वाढतील आणि दक्षिण कोकणात दहा जूनच्या आसपास दाखल होईल. विदर्भात १३ जूनच्या आधी मोसमी पाऊस अपेक्षित नाही. शेतकऱ्यांनी मात्र सावध राहावे, पेरणीची घाई करू नये.

अक्षय देवरस, हवामान अभ्यासक, रेडिंग विद्यापीठ

Exit mobile version