breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अन् प्रकाश आंबेडकरांनी भोसरीमध्ये घेतली कोरोना प्रतिबंधक लस

  • शिवसेना नगरसेवक राहूल कलाटे यांच्या उपस्थितीने चर्चेला उधान
  • वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते गेले कुठे ?

पिंपरी / महाईन्यूज

सध्या शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन लस टोचून घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी भोसरी येथील रुग्णालयात लस घेतली. प्रकाश आंबेडकर यांची अचानक शहरात एंट्री झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेचे पालिकेतील माजी गटनेते राहूल कलाटे यांची उपस्थिती बोलकी ठरू लागली आहे. शिवसेनेत कोंडमारी होऊ लागल्याने कलाटे यांनी आता वंचितचा मार्ग धरला की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जुने भोसरी रुग्णालय येथे प्रकाश आंबेडकर यांनी कोवॅक्सिन लस घेतली. यावेळी शिवसेनेचे कलाटे यांच्यासह भोसरी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर त्यांच्यासोबत होते. प्रकाश आंबेडकर यांनी लस घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोत राहूल कलाटे यांची छबी दिसते. खुद्द पक्षाचे राष्ट्रीय नेते भोसरीत आले असताना याठिकाणी वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी होणे आपेक्षित होते. मात्र, वंचितचा एकही कार्यकर्ता उपस्थित नसताना कलाटे यांची उपस्थिती बोलकी ठरली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कलाटे यांची पक्षात कोंडमारी होत आहे. पालिकेत शिवसेनेची डरकाळी फोडणारे कलाटे यांच्या तक्रारी थेट मातोश्रीवर धडकल्यानंतर त्यांना गटनेते पदावरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून ते पक्षश्रेष्ठींवर कमालीचे नाराज असल्याचे दिसते. म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असावा का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील विधानसभा 2019 च्या निवडणुकीवेळी राहूल कालाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून अर्ज भरला होता. त्यावेळी पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर कलाटे आणि आंबेडकर यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले असावेत. कदाचित त्यामुळेच कलाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लसीकरण केंद्रावर जाणे पसंद केले असावे, असा ही तर्क कलाटे समर्थकांनी लढविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button