पिंपरी / चिंचवड
पिंपळे निलख येथे उद्या प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा
पिंपरी : पिंपळे निलख येथील ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत उद्या, दि. ७ एप्रिल रोजी प्रभू श्री रामचंद्र भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
या अध्यात्मिक कार्यक्रमासाठी पिंपळे निलख येथील स्थानिक नागरिक, भाविक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सायंकाळी ६ वाजता श्रींची मिरवणूक झाली. त्यानंतर उद्या सकाळी ११ वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पिंपळे निलख येथील ग्रामस्थांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.