breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजौरी सीमेवर शक्तिशाली स्फोट; २ जवान शहीद, ४ जबर जखमी

श्रीनगर – राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या सटी अग्रीम चौकीजवळ शनिवारी भारतीय सैन्याचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी तिथे झालेल्या स्फोटात २ जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह अन्य ४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाकव्याप्त काश्मीरजवळील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याचे जवान शनिवारी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्यावेळी सटी अग्रीम चौकीजवळ स्फोट झाला. त्यात लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत सिंह हे २ जवान शहीद झाले. ऋषी कुमार हे बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील, तर मनजीत सिंग पंजाबमधील भटिंडाचे रहिवासी होते. या स्फोटात आणखी एका लष्करी अधिकाऱ्यांसह ४ जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button