ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नागपुरमध्ये तब्बल ७ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

नागपूर  |  नागपुरमध्ये तब्बल ७ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने वीजबील थकबाकीदार ग्राहकांवर धडक मोहीम राबवली आहे. नागपुरात ७,१२७ थकबाकीदार ग्राहकांची वीज कापली आहे. राज्यातही महावितरणने कारवाईला सुरुवात केली आहे. विजबील खंडित असेल तर कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणने कारवाईचा बडगा उगारताच ग्राहकांनी वीजबील भरणा करण्यास सुरुवात केली आहे. यात महावितरणला ३१,४७७ एवढ्या ग्राहकांनी १९ कोटी १९ लाख रुपयांचा वीजबील भरणा केला आहे. तर या कारवाईत महावितरणने ११२ जणांविरुध्द कारवाई केली आहे. महावितरणच्या कारवाईस राज्यात विरोध सुरू आहे. शेतकऱ्यांनी या विरोधात आंदोलने केली आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज खंडित केल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी वीजबील माफ करण्याची मागणीही केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button