TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कातवी उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यांची दुरावस्था; भीषण अपघाताचा धोका

पिंपरी चिंचवड | वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यावरील कातवी पुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणारे वाहन चालक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे या भागात भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गंभीर अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तीच मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, वडगावचे माजी उपसरपंच विशाल वहिले यांनी देखील आता केली आहे. या रस्त्यावरून अनेक कामगार, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक आदींची मोठी वर्दळ असते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करत अडथळ्यांची शर्यत पार करा करावी लागत आहे. अनेकदा छोटे-मोठे अपघातही होतात. ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेऊन एमआयडीसी अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित दुरुस्ती करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, वडगावचे माजी उपसरपंच विशाल वहिले म्हणाले की, मागील काही दिवसांपासून कातवीच्या पुलाजवळील रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडे मागणी होत असून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. वाहनाचे अपघात होऊ शकतात यामुळे खड्डे बुजविणे गरजेचे आहे. आतातरी एमआयडीसीने जबाबदारी घेतली पाहिजे वडगाव, तळेगाव औद्योगिक नगरीत जाण्यास या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहते का? लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील वहिले यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button