breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान

रायगड |

रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या आहेत. ७९ प्रभागांसाठी २३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, उद्या ८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी ५१६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  रायगड जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून ६ नगरपंचायतीमधील ७९ प्रभागातील २३४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. ३४ हजार ६४० मतदार यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सहा नगरपंचायतींमध्ये १०२ प्रभागसंख्या आहे. त्यापैकी २१ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ८१ प्रभागामध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यापैकी २ प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ७९ प्रभागांमध्ये २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. ८२ मतदान केंद्रांमध्ये ८२ ईव्हीएम मशीनद्वारे हे मतदान घेण्यात येणार आहे. एखाद्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यास तेथे व्यवस्था व्हावी म्हणून ७२ मतदान यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. ५१५ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १७ हजार ३४४ महिला आणि १७ हजार २६९ पुरुष मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यावरून २३४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्‍चित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button