breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कार्यकारी अभियंत्याकडून पिस्तुलाच्या मागणीनंतर राजकारण तापले; सत्तेचा ठेकेदारास पाठिंबा आहे काय, भाजपचा सवाल

बीड |

अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू असून कंत्राटदार धमक्या देऊन, कटय़ार दाखवून देयकांवर स्वाक्षऱ्या घेतात, असा खळबळजनक आरोप करून इथे व्यवस्थित काम करता यावे त्यासाठी आपल्याला पिस्तूल देण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजयकुमार कोकणे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना थेट पाठविलेल्या पत्रात कोकणे यांनी ही मागणी केली असून त्यांच्या या मागणीने येथील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागात डिसेंबर २०२१ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून संजयकुमार कोकणे (रा. नाशिक) यांची नियुक्ती झाली. अंबाजोगाईत येताच त्यांनी येथील कारभाराबद्दल आपली नाराजी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र लिहून व्यक्त केली आहे. आपल्या जिवाला धोका असून या ठिकाणी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीतीही कोकणे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

दरम्यान, या पत्रानंतर बीड जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने बोलताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या ठेकेदारापासून संरक्षण मिळावे अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणे हे दुर्दैव आहे. जिल्ह्यातील माफियांना सत्तेचा पािठबा नाही कशावरून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वाळू, गुटखा माफिया, चोर, गुंडांना अभय, खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली असून जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणण्याचे काम कोणी करत असेल तर त्याची गय नाही असे म्हटले आहे. जिल्ह्यात माफियाराज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, असा प्रश्नही आता भाजपचे नेते विचारू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button