breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं कधी आणि कुठे पाहाता येणार? सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांचा मुद्दा चर्चेला आला. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांच्या सत्यतेवर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं कधी आणि कुठे पाहाता येणार? याविषयीही घोषणा केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला. येत्या १९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा      –      अवघ्या एकाच वर्षात समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या! २० वर्षे खड्डे पडत नसल्याची दिली होती गॅरंटी 

लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. यावरून चर्चा सुरू झालेली असताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावं. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचं उत्तर आलं. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button