ताज्या घडामोडीराजकारण
केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू
अंतर्गत कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबार, बहिण जखमी

बिहार : अंतर्गत कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एका केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या भागलपुरमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. अंतर्गत वादातून झालेल्या या गोळीबारात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू झाला. दुसरा भाचा आणि बहिण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
हेही वाचा : सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवगछियाच्या जगतपुर भागातील ही घटना आहे. दोन भाऊ आपसात भिडले. परस्परांवर गोळीबार केला. एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. मृताची ओळख पटली असून त्याचं नाव विश्वजीत आहे. जयजीत आणि त्याची आई मीना जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.