Breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गोवा सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ; ₹9,000 वरून ₹12,000

“स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि कल्याण सुनिश्चित करणे हे सरकारचे कर्तव्य आहे”; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी | गोवा सरकारने बुधवारी स्वातंत्र्यसैनिकांच्या मासिक निवृत्तीवेतनात वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केला. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीच्या बैठकीत स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी लाभ व सहाय्य अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

या निर्णयानुसार स्वातंत्र्यसैनिकांचे मासिक निवृत्तीवेतन आता ₹१२,००० करण्यात आले असून भत्ता ₹३,००० वरून वाढवून ₹५,००० करण्यात आला आहे. हे निर्णय स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सरकारची कटिबद्धता दर्शवतात.

हेही वाचा     :            1970 नंतर पहिल्यांदाच घुमानमध्ये घुमला कीर्तनाचा आवाज!

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या स्वातंत्र्याचा पाया रचला आहे. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे, त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सर्व हक्काचे लाभ वेळेत व संवेदनशीलतेने उपलब्ध करून देणे, यासाठी सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे.”

त्यांच्या सेवा व त्यागाचा सन्मान करण्यासाठी, दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्य सरकारच्या वतीने उपजिल्हाधिकारी आणि उपअधीक्षक (पोलीस) उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करतील, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच समितीने मांडलेल्या सर्व योग्य व रास्त बाबी संबंधित विभागांशी समन्वय साधून सोडवण्यात येतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button