Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नवी दिल्लीतील ‘सट्टे’ मध्ये पर्यटन विभागाचे विशेष दालन

मुंबई :  दक्षिण आशियातील अग्रगण्य बी२बी प्रवास व पर्यटन प्रदर्शन सट्टे २०२६ (साउथ एशियाज ट्रॅव्हल अॅड टूरिझम एक्सचेंज (एसएटीटीई) च्या ३२व्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सहभाग घेऊन विशेष दालन उभारले. नवी दिल्ली येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर, द्वारका येथे २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनाने देश-विदेशांतील पर्यटक व व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेतले.

या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनाचे उद्घाटन पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले.  इनफॉर्मा मार्केट्सद्वारे आयोजित प्रदर्शनामध्ये ५० हून अधिक देश व २८ राज्यांतील पर्यटन मंडळांनी सहभाग घेतला होता.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचे नेतृत्व पर्यटन संचालनालयाचे  सहसंचालक  संतोष जाधव, पर्यटन संचालनालयाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व उपसंचालक पर्यटन विजय जाधव यांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाच्या दालनामध्ये हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. तसेच त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यावसायिकांशी बी२बी बैठकांद्वारे संवाद साधला.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटींचा अर्थसंकल्प

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनामध्ये एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक गड-किल्ले, कोकण किनारपट्टीचे सौंदर्य, वन्यजीव पर्यटन, तीर्थक्षेत्रे, शहरी पर्यटन, माईसचे वाढते क्षेत्र याची नव्याने ओळख करुन देण्यात आली.

या प्रदर्शनाबाबत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “सट्टे आणि दिल्ली रोड शोमधील महाराष्ट्राचा सहभाग हा राज्याला जागतिक पर्यटनामध्ये यशस्वीरित्या अधोरेखित करण्यास मदत करत आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंतच्या पर्यटन स्थळांद्वारे आम्ही पर्यटकांना आमंत्रित करत आहोत. त्याचबरोबरीने एक आधुनिक आणि शाश्वत पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर महाराष्ट्राला प्रभावीपणे अधोरेखित करण्याचा आमचा मानस आहे. सदर प्रदर्शनाद्वारे गुंतवणूकदार आणि पर्यटन भागधारकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातूनच जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे”.

याप्रसंगी पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक संतोष जाधव म्हणाले की, “राज्याच्या पर्यटन धोरणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘सट्टे’ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाद्वारे आम्ही राज्यातील पर्यटन संधी, धोरणातील गुंतवणूकीपर प्रोत्साहने नव्याने जगासमोर आणत आहोत. जगभरातील पर्यटकांना राज्यातील पर्यटनाकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

प्रदर्शनाची सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन वैविध्यतेचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर विशेष सादरीकरणाद्वारे राज्यातील ऐतिहासिक वारसा, वन्यजीव, विस्तीर्ण समुद्रकिनारे, आध्यात्मिक केंद्रे आणि अनुभवात्मक पर्यटनाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख निर्माण करुन देण्यासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन प्रतिनिधी आणि दिल्लीतील व्यावसायिक यांच्यात बी२बी चर्चा झाली. यामुळे भविष्यातील पर्यटन व्यवसाय संधींसाठी अधिक प्रेरणा व बळकटी मिळाली आहे. उद्योग क्षेत्रातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मान्यवरांमध्ये चर्चाही झाली.  या प्रदर्शनाद्वारे पर्यटन नकाशावर महाराष्ट्र राज्य नव्याने अधोरेखित झाले आहे. विशेषतः यंदा ऐतिहासिक वारसा, शाश्वत पर्यटन, माईस व किनारी पर्यटनावर विशेष भर देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button