राज्यात सर्वाधिक मते मिळवण्याच्या यादीत शंकर जगताप पहिल्या; तर महेश लांडगे दुसऱ्या स्थानावर!
मिशन विधानसभा: मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पाचवे स्थान
पुणे: राज्यात २८८ पैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे १३२ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. नवनिर्वाचित आमदारांमध्ये २ लाख ३५ हजार ३२३ मते मिळवून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राज्यात सर्वाधिक मते (Highest Votes) मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. सर्वाधिक मते मिळविणाऱ्या आमदारांच्या यादीत दुसरे स्थान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पाचवे स्थान मिळविले आहे.
सर्वाधिक मते मिळविणारे Top 10 आमदार (Highest Votes)
शंकर जगताप (चिंचवड) – २ लाख ३५ हजार ३२३ मते (मताधिक्य १,०३,८६५)
महेश लांडगे (भोसरी) – २ लाख १३ हजार ६२४ मते (मताधिक्य ६३,७६५)
धनंजय मुंडे (परळी) – १ लाख ९४ हजार ८८९ मते (मताधिक्य १,४०,२२४)
ज्ञानेश्वर कटके (शिरुर) – १ लाख ९२ हजार २८१ मते (मताधिक्य ७४,५५०)
सुनील शेळके (मावळ) – १ लाख ९१ हजार २५५ मते (मताधिक्य १,०८,५६५)
प्रताप सरनाईक (ओवळा माजीवाडा) – १ लाख ८४ हजार १७८ मते (मताधिक्य १,०८,१५८)
प्रशांत ठाकूर (पनवेल) – १ लाख ८३ हजार ९३१ मते (मताधिक्य ५१,०९१)
अजित पवार (बारामती) – १ लाख ८१ हजार १३२ मते (मताधिक्य १ लाख ८९९)
काशीराम पारवा (शिरपूर) – १ लाख ७८ हजार ०७३ मते (मताधिक्य १,४५,९४४)
शिवेंद्रराजे भोसले (सातारा) – १ लाख ७६ हजार ८४९ मते (मताधिक्य १,४२,१२४)
मताधिक्यात शिरपूरचे आमदार काशीराम पारवा अव्वल (Highest Votes)
महायुतीचे अनेक उमेदवार हे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. सर्वाधिक मताधिक्य (Highest Votes) घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. शिरपूर मतदारसंघातील काशीराम पारवा यांनी तब्बल १ लाख ४५ हजार ९४४ इतके विक्रमी मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
त्या खालोखाल सातारा येथील भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांना १ लाख ४२ हजार १२४ इतके तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी १ लाख ४० हजार २२४ चे मताधिक्य घेतले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य (Highest Leads) कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना मिळाले असून त्या खालोखाल मताधिक्य सुनील शेळके व शंकर जगताप यांनी मिळविले आहे.
सर्वाधिक मताधिक्याने (Highest Leads) विजयी झालेले महाराष्ट्रातील 10 आमदार :
1. शिरपूर – काशीराम पारवा (भाजपा) – १ लाख ४५ हजार ९४४ विक्रमी मताधिक्याने विजयी.
2. सातारा मतदारसंघ- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – १ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजयी.
3. परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – १ लाख ४० हजार २२४ मतांनी विजयी
4. बागलाण- दिलीप बोरसे (भाजप) – १,२९,२९७ मतांनी विजयी
5. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना) – १ लाख २० हजार ७१७ मतांनी विजयी
6. कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप)- १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी
7. मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – १ लाख ८ हजार ५६५ मतांची विजयी
8. ओवळा माजीवड -प्रताप सरनाईक (शिवसेना) – १ लाख ८ हजार १५८ मतांनी विजयी.
9. दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिवसेना) – १ लाख ६ हजार ६०६ मतांनी विजयी
10. चिंचवड मतदारसंघ – शंकर जगताप (भाजप) – ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.
11. बारामती मतदारसंघ – अजित पवार (राष्ट्रवादी) – १ लाख ८९९ मतांनी विजयी
या शिवाय मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे ९६ हजार २२८ मतांनी विजयी झालेत. तर बोरिवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे ९५ हजार ५४ मतांनी जिंकले आहेत.





