संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. याबद्दल गृहमंत्रालयाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं देखील धनंजय देशमुख म्हणाले. उद्याच आपण या संदर्भात गृहमंत्रालय आणि पोलीस अधिक्षक यांना या संदर्भात असर्ज करणार असल्याचं देखील देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
हेही वाचा – तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार
यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, हत्येला 4 महिने झाले आहेत. जेल प्रशासनात घडलेला जो घटनाक्रम आहे तो बघता आम्ही आमच्या सगळ्या फिर्यादीना घेऊन एक अर्ज पोलीस अधिक्षक आणि गृहमंत्रालयाला देणार असून सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी करणार आहे.’ असं देशमुख यांनी म्हंटलं.