Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर अखेर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

Rupali Chakankar Resignation : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अशोक खरात प्रकरणाबाबत आता रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहित उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, “आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्यावतीने पत्र दिलं. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा –  ‘चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या आधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर करत रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, “आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कठोर कारवाई व्हावी याबाबत त्यांना राज्य महिला आयोगाच्यावतीने पत्र दिले”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याबरोबर अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या अशोक खरातच्या पाया पडताना, पाद्यपूजन करताना, छत्री धरताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत असून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले होते की, “अशोक खरात प्रकरणी निश्चित कारवाई केली जाणार आहे. या तपासणीतून आणि चौकशीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचीही नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून योग्य ती कारवाई करू.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button