Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना — महाराष्ट्रात एकात्मिक सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर

मुंबई :  आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात एकात्मिक व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने “आरोग्य आणि वेलनेस मधील नवकल्पना — पुढील पिढीतील उत्कृष्टता केंद्रे उभारणे” या विषयावर महत्त्वपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले.

पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी केलेल्या चर्चेत खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केवळ प्रशिक्षण नव्हे तर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट यांच्यासह दंतचिकित्सेचा (Oral Health) समन्वय अत्यावश्यक असण्याबाबत एकमत झाले. दंत आरोग्याचा खेळाडूंच्या ऊर्जा, पुनर्प्राप्ती, एकाग्रता व शरीराच्या संतुलनावर थेट परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

तसेच, पुढील पिढीतील सेंटर ऑफ एक्सलन्स हे केवळ उपचार केंद्र नसून, क्रीडा वैद्यक, दंतचिकित्सा, पुनर्वसन व वेलनेस यांचा समावेश असलेली एकात्मिक आरोग्य व्यवस्था म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा –  सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

इंग्लंड क्रिकेट बोर्ड च्या सल्लागार डॉ. अनिता बिस्वास यांनी जागतिक अनुभवांच्या आधारे सांगितले की, क्रीडा व व्यायाम वैद्यकशास्त्राचा विकास हा दीर्घकालीन नियोजन, शासकीय पाठबळ आणि संरचित प्रशिक्षण व्यवस्थेवर आधारित असतो. विशेषतः २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या एकात्मिक प्रणालीमुळे क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे उदाहरण देण्यात आले.

यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स चे सल्लागार डॉ क्रेग झालेकी यांनी यूकेमधील प्रशिक्षण पद्धतीचा उल्लेख करताना क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ होण्यासाठी ८ ते ९ वर्षांचे सखोल प्रशिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय शिक्षण, विविध विभागांतील अनुभव व विशेष परीक्षा यांचा समावेश असतो.

दंतचिकित्सेच्या संदर्भात बोलताना, डॉ. संदेश मयेकर ओरल केयर सेंटरचे दंतचिकित्सक डॉ. संदेश मयेकर लहान वयापासून माउथ गार्डचा वापर, नियमित तपासणी आणि योग्य दातांची जुळणी (bite) यामुळे खेळाडूंची कामगिरी सुधारते, असे सांगण्यात आले. तसेच,   तोंडातील आजारांचा परिणाम हृदयविकार, मधुमेह, किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांवर होऊ शकतो, त्यामुळे दंत आरोग्याला आरोग्य व्यवस्थेत समान महत्त्व देणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.

नागपूर डेंटल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी भारतामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, तंबाखू व निकोटीनचे सेवन हे यामागील प्रमुख कारण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. क्रीडा क्षेत्रातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल उभारण्याबाबत सत्रात चर्चा झाली. हे मॉडेल केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सत्रात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे समन्वयन इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीचे संचालक डॉ. अतुल सुर्वे आणि नेशनल हेल्थ सर्विसचे वरिष्ठ सल्लागार अस्थीरोग शल्य चिकित्सक डॉ रवी बेडगे यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button