breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मागल्या जन्मी पाप करणारा या जन्मी साखर कारखाना काढतो किंवा..’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांनी साखर कारखान्यांवर भाष्य केलं आहे. ज्या लोकांनी मागील जन्मी पाप केलेलं असतं ते लोक या जन्मी साखर कारखाना काढतात, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच विदर्भात चार साखर कारखाने सुरू करून मी चूक केली, अशी कबुली गडकरी यांनी दिली. ते अमरावती येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जे लोक मागील जन्मी पाप करतात ते या जन्मी साखर कारखाना काढतात किंवा वर्तमानपत्र सुरू करतात. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन नेत्यांनी असाच एक साखर कारखाना माझ्या गळ्यात बांधला. ते दोघे कारखाना माझ्याकडे सोडून निघून गेले. मी त्यांना खूप आग्रह केला होता की माझी साखर कारखाना काढण्याची इच्छा नाही. मात्र त्यांनी माझं काही ऐकलं नाही. कारखाना माझ्या गळ्यात बांधला. माझी एक सवय आहे, मी जे काम करायला घेतो ते सोडत नाही. त्यामुळे मी तो कारखाना चालवला. भंडारा, गोंदियाच्या विकासासाठी हा साखर कारखाना मी चालू ठेवला आहे. आता ६०० कोटी रुपये खर्च करून या कारखान्या विस्तार करणार आहे. याचा दोन्ही जिल्ह्यांना खूप फायदा होईल.

हेही वाचा    –    महायुतीत असताना उमेदवार कसा जाहीर करता? हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना सवाल 

आपल्या देशातलं राजकारण बदलत चाललं आहे. आपली लोकशाही चार स्तंभांवर उभी आहे. त्यांचा समतोल राहिला तर लोकशाही यशश्वी होते. आपण (भारत) जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत. म्हणूनच भारताला लोकशाहीची जननी असं संबोधलं जातं. इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षाही आपली लोकशाही अधिक प्रगल्भ आहे. त्यात आपल्या वर्तमानपत्रांचा वाटा देखील मोठा आहे. लोकप्रबोधन, लोकशिक्षण व लोकसंघर्ष या त्रिसुत्रीवर आधारित आपल्या वर्तमानपत्रांचं कार्य चालत आलं आहे. ज्या ज्या वेळी देशावर संकटं आली आहेत, त्या त्या वेळी आपल्या पत्रकारांनी देशाला आणि समाजाला मार्गदर्शन केलं आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button