breaking-newsMarathi - TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही’; मंत्री नितेश राणेंचा राऊतांना टोला

नागपूर | संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी रेकी करायची गरज नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, की खिचडीचोर नेमका कुठे राहतो, खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत. संजय राजाराम राऊत यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्यांचे राजकीय महत्त्व जनतेने संपविले आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी आम्ही गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विन आला आहे. याला फार गांभीर्याने घेऊ नये.

हेही वाचा    –      ‘मंत्रिपद नसल्याने मन लागत नाही’; अजितदादांचा आणखी एक आमदार नाराज 

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काल संजय राऊत यांनी दावा केला होता की, भांडुपमधील त्यांचे निवासस्थानच नाही तर दिल्लीतील सामना कार्यालय आणि घरावरही पाळत ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नाही. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button