Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘प्रभू श्रीराम हे जीवनाचा आदर्श’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : समाजात सर्व प्रकारचे आदर्श प्रस्थापित करण्याचे कार्य प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले. त्यामुळेच श्रीराम हे आपल्या सर्वांच्या जीवनाचा आदर्श असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी केले.

पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. समाजात समता असली पाहिजे हे प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनातून दाखवून त्याच प्रकारे कार्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतानाच उपस्थिताना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मायाताई इवानते ,आमदार विकास ठाकरे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

सायंकाळी मंदिरात आगमन होताच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते पालखी पूजन व आरती करण्यात येऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सरचिटणीस राजीव काळेले, मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, योगेश पाचपोर, अनिरुद्ध पालकर, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

नागपूर नगरीचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेतही मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे यंदा साठावे वर्ष आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मायाताई इवानते, आमदार प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, माजी मंत्री रमेश बंग, माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभी राम, लक्ष्मण, सीता माई यांच्या मूर्तीची पूजा करून श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर जय श्रीरामच्या जयघोषात अतिथिनी रथ ओढून शोभायात्रेचा शुभारंभ केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button