जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाईनी भरला अर्ज!
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या दिग्गज नेत्यांची उपस्तीथी
पुरंदर : राज्यात स्थानिक स्वराज्य सार्वत्रिक निवडणकांचे बिगुल वाजले असून लक्षवेधी ठरलेल्या खंडोबा जेजुरी नगरीच्या नगरपालिका निवडणूका करिता राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आणि शरद पवार गटाच्या एकजूट निवडणूक लढण्याच्या निर्णया नंतर जेजुरीनगरींचे पंचवीस वर्ष निवडणूक लढवून अध्यक्षपदाची धुरा संभाळणारे जेष्ठ माजी अध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांचे सुपुत्र जयदीप बारभाई यांनी नगराध्यक्ष उमेदवार पदाचा अर्ज दाखल केला.
हेही वाचा : जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाईनी भरला अर्ज!
त्या वेळी पुरंदरचे दिग्गज नेते जालिंदरभाऊ कामथे, प्रा दिगम्बर दुर्गाडे, वमानराव जगताप, संदिप आप्पा जगताप रोहिदास कुंभार, रमेश लेंडे,गणेश निकुडे योगेश जगताप,माजी नगराध्यक्ष लता दोडके, तसेच नगरसेवक उमेदवार आणि जेष्ठ नेते वर्ग उपस्तिथ होते अर्ज भरते वेळी राष्ट्रवादी च्या युवा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, जेजुरी च्या सर्व प्रथम लोक सुविधाना महत्व देऊन जेजुरी नगरीचा विकास करून खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर सुविधा असलेली नगरीं बनवण्या चा मानस यावेळी व्यक्त जयदीप बारभाई यांनी मानस व्यक्त केला.




