माजी आमदार रमेश कदम ८ वर्षांनंतर तुरूंगा बाहेर, २ वेळा तुरूंगातून लढवलेली निवडणूक

पुणे : आठ वर्षांपासून तुरूंगात असणारे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आज अखेर बाहेर आले आहेत. आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३१२ कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम हे तुरूंगात होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर ते आठ वर्षांना तुरूगा बाहेर आले आहेत.
कोण आहेत रमेश कदम?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माजी आमदार आहेत. नंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये तुरूंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कदम यांच्यावर आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ते महामंडळाचे अध्यक्ष असताना हा घोटाळा केला होता.
हेही वाचा – ‘अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणायचे आता किसिंग..’; ठाकरे गटाची खोचक टीका
रमेश कदम यांच्यावर सोलापूर, पुण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल ३१२ कोटी रुपयांचा हा कथित घोटाळा असल्याचं सागितलं जात आहे. या प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे ते आठ वर्ष तुरुंगात होते. आज अखेर ११ वाजता त्यांची तुरुंगातून सुटका झाली.





