breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

FACT CHECK  : चिखली घरकूलमध्ये पावसाचे पाणी साचले त्याला जबाबदार कोण?

‘फेक नॅरेटिव्ह सेट’ करण्यासाठी इच्छुकांकडून आरोपांची चिखलफेक : राजकीय चढाओढीमुळे पिंपरी-चिंचवडकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरात आणि पवना धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पाऊस पडला. किंबहुना, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील जनजीवन विस्कळीत झाले. अपेक्षेप्रमाणे पावसाचे, पूर परिस्थितीचे राजकारण सुरू झाले. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले. 

शहराच्या विविध सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी चिखलफेक करण्याची संधी सोडली नाही. विशेषत: चिखली घरकूल प्रकल्पामध्ये शिरलेले पाणी यावरुन राजकारण तापले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना टीकेचे धनी बनवले. किंबहुना, ‘‘साचलेले पाणी हे आमदारांच्या निष्क्रीयतेचे पाप आहे’’ असा गंभीर आरोपही केला. सोशल मीडियावर आमदार लांडगे यांच्यावर ‘रिल्स’ बनवण्यात आले. त्याद्वारे ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न झाला.

वास्तविक,  सदर प्रकल्पामध्ये पाणी का साचले? त्याची तांत्रिक व भौगोलिक कारणे काय आहेत? या प्रकल्पाचे स्वरुप काय आहे? आणि झालेली आरोपांची चिखलफेक योग्य आहे का? याबाबत ‘महाईन्यूज’ ने ‘‘FACT CHECK ’’ करण्याचा प्रयत्न केला.

1.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ १९९७ मध्ये झाली. त्यावेळी चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव आदी गावांचा समावेश करण्यात आला. तपूर्वी, महानगरपालिका प्रशासनाकडून जुन्या हद्दीलगत असलेल्या चिखतील जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यान्वयीत केला होता. जो आजही तिथे आहे.

2. सदर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केले पाणी पूर्वी शेजारील तलावात साठवले जात होते. ते पाणी घरकूल विकसित होण्यापूर्वी परिसरातील शेतकरी शेतीसाठी वापर करीत होते. पावसाळ्यात तळ्यातील पाणी ‘ओव्हर फ्लो’ होत असे. ते पाणी नाल्याद्वारे नेवाळेवस्तीकडून काढून दिले जात असे.

3. २००७ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने  JNNURM प्रकल्पांतर्गत आर्थिंकदृष्या दुर्बल घटकांसाठी १३ हजार २५० सदनिका बांधण्याची योजना हाती घेतली. संपूर्ण आरक्षण ताब्यात न आल्यामुळे पुरेशा जागेअभावी ६ हजार ७२० सदनिकांचा ‘घरकूल प्रकल्प’ उभारण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले. २००९ मध्ये सदर कामाला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी ‘‘घरकूल प्रकल्पात पाणी साचले… विकासामध्ये नियोजनाचा अभाव… बकालपणा…’’ असे शब्द वापरुन आरोप करणारी मंडळी सत्ताधारी किंबहुना महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यरत होते.

4. घरकूल प्रकल्प ज्या ठिकाणी उभारण्यात आला. त्याच्या शेजारी ‘स्पाईन रस्ता’ विकसित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या या जागेतून पूर्वी मुरूम काढला जात असे. सदर जागा महानगरपालिकेला हस्तांतरीत करुन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले. पण, स्पाईन रस्ता आणि घरकूल प्रकल्प यांची ‘आलाईमेंट’ व भौगोलिक रचना (चढ-उतार) याचा विचार नियोजनात झाला नाही.

5. घरकूल प्रकल्प स्पाईन रस्त्यापेक्षा सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचते. तसेच, एसटीपीतून बाहेर पाण्यासाठी स्वंतत्र पाईपलाईन केली नाही आणि जी पाईपलाईन बसवली आहे ती कमी व्यासाची आहे.  पुन्हा सदर पाणी हे घरकुल प्रकल्पाच्या पाईपलाईनमध्येही सोडण्यात आले आहे. परिणामी, पावसाळ्यात एसटीपी ओव्हर फ्लो झाला की त्याचे पाणी घरकूलमध्ये शिरते, ही तांत्रिक अडचण प्रकल्पा उभारल्यापासूनची आहे, आजची नाही.

6. विशेष म्हणजे, घरकूल प्रकल्प उभारण्यात आला. सुमारे ७ हजार कुटुंब व किमान २५ हजार नागरिकांचा हा प्रकल्प आहे. पण, या ठिकाणी फक्त पाणी साचत नाही, तर इतरही अनेक समस्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पार्किंग, गार्डन, शाळा, खेळाचे मैदान, दवाखाना, सभागृह, मार्केट, पेव्हर ब्लॉक अशा पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. २००९ साली काम सुरू केलेला आणि २०१४ मध्ये अपूर्णावस्थेत असतानाही त्यावेळी काँग्रेस आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळवण्यासाठी नागरिकांना राहण्यास ताबा दिला. त्यामुळे ‘प्लॅनिंग स्टेज’च्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सुरूवातीपासूनच हा प्रकल्प समस्यांच्या विळख्यात आहे. 

आमदार महेश लांडगे यांनी घरकूलसाठी काय केले? 

अतिमुसळधार पावसामुळे पाणी साचले म्हणून महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी पाण्यात उतरून ‘ब्रँडिंग’ केले. सोशल मीडियावर आरोपांची राळ उडवून दिली. मग, आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी काय केले? हेसुद्धा आम्ही तपासले. काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेला आणि अपूर्णावस्थेत असलेला प्रकल्पात कोणतेही राजकीय भांडवल न करता टाऊन हॉलचे काम पूर्ण झाले आहे. खेळाचे मैदान वापरात आहे. भाजी मंडई, व्यापारी गाळे याचे वाटप झाले आहे. तसेच,  दवाखानाही कार्यान्वयीत झाला आहे. आता घरकूलसाठी स्वतंत्र पोलीस ठाणेसुद्धा सुरू करण्याचे नियोजन केले.  यापूर्वीच घरकूल आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दोन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्तावित केले आहे. घरकूलमधील जुनी ड्रेनेज लाईन बदलून मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button