भोसरीत डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला
पिंपरी : आज भोसरी पीएमटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून वंदन करून प्रचाराचा नारळ फोडला. लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या आणि सगळीकडेच आता प्रचाराची लगबग सुरू झाली काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी आणला आहे. तसेच बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केले आणि बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू केल्या. त्यामुळे संपूर्ण भोसरीकर अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांचा विजय होईल असे तुषार कामठे म्हणाले. सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटली आणि भोसरी गावठाणाचा परिसर पिंजून काढला.
यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे सरचिटणीस जयंत शिंदे, समन्वयक गणेश भोंडवे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस हरिभाऊ डोळस, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश अल्हाट, सेवादल अध्यक्ष अरुण थोपटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, उद्योग व्यापार अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, के. डी. वाघमारे, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ, ख्रिश्चन सेल अध्यक्ष शौल कांबळे, काळे, असंघटित महिला अध्यक्ष वंदना आराख,पंचशीला आगळे, अशोक तनपुरे, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, अनिल भोसले, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शोभाताई साठे, संघटक राजू खंडागळे, संघटक विधाते, योगेश सोनवणे,सुदाम शिंदे, सुशांत खुरासाने, राहुल धनवे,कविता कोंडे, पंचशीला आगळे, रोहित जाधव आदी उपस्थित होते.