Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर आहेत.उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन केले. केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी, लंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, वैभव खांडगे, केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन, स्मारक व्यवस्थापक श्री. फहद, उद्योजिका अनुश्री चौगुले उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत अभ्यास करून शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाने या निवासस्थानाला शासकीय दर्जा दिला असून, येथील व्यवस्था शासनातर्फे उत्तम राखली जात आहे. स्मारकाची देखभाल, सुशोभीकरण अधिक समृद्ध करण्यासाठी आणि येथील कर्मचारी वर्गास मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या स्मारकाच्या गौरवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले व निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे सतत लक्ष असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा –  पंतप्रधानांकडून इंडिया AI समिटमध्ये MANAV व्हिजन सादर ; म्हणाले, “एआय हे भविष्य..”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात ज्या घरात वास्तव्य केले होते, ते घर आता ‘डॅा. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये हे घर खरेदी करून स्मारकात रूपांतरित केले आहे. हे स्मारक किंग हेन्रीज रोड, कॅम्डन, लंडन येथे आहे. येथे बाबासाहेबांच्या जीवनातील छायाचित्रे, काही वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या कार्याचे प्रदर्शन घडते.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button