Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले.

विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा’; पणन मंत्री जयकुमार रावल

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून, अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी, अकोला ₹३६.७६ कोटी, अमरावती ₹५३.३४ कोटी, बीड ₹७२.७० कोटी, भंडारा ₹४१.६५ कोटी, बुलढाणा ₹६६.७४ कोटी, चंद्रपूर ₹४७.९५ कोटी, छत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटी, धाराशिव ₹४६.८५ कोटी, धुळे ₹३०.६३ कोटी, गडचिरोली ₹२८.५० कोटी, गोंदिया ₹४२.४५ कोटी, हिंगोली ₹३५.०० कोटी, जळगाव ₹७७.४० कोटी, जालना ₹५८.८२ कोटी, कोल्हापूर ₹९२.३३ कोटी, लातूर ₹५३.८७ कोटी, नागपूर ₹३३.८८ कोटी, नांदेड ₹७६.५० कोटी, नंदुरबार ₹२०.४७ कोटी, नाशिक ₹८३.८६ कोटी, पालघर ₹१९.९५ कोटी, परभणी ₹४९.७९ कोटी, पुणे ₹८५.२४ कोटी, रायगड ₹२२.७९ कोटी, रत्नागिरी ₹ ३१.२१ कोटी, सांगली ₹७५.४९ कोटी, सातारा ₹८७.०७ कोटी, सिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटी, सोलापूर ₹९७.५२ कोटी, ठाणे ₹१४.१८ कोटी, वर्धा ₹२५.६० कोटी, वाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button