ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भाजपने पुन्हा एकदा मनसेला डिवचणारे बॅनर लावले

राज्यातल्या शाळांना पहिले ते पाचवीपर्यंत इंग्रजी बरोबर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती

दादर : भाजपने पुन्हा एकदा मनसेला डिवचणारे बॅनर लावले आहेत. भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलेलं असतानाच दादरच्या शिवसेना भवन परिसरात भाजपने बॅनरबाजी करून मनसेला डिवचलेलं बघायला मिळत आहे. ‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती..’ अशा आशयाचे हे बॅनर आहेत.

हेही वाचा –  ‘बहिणाबाईंच्या कविता आजही समर्पक’; शंकर जगताप

राज्यातल्या शाळांना पहिले ते पाचवीपर्यंत इंग्रजी बरोबर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाषेचा वाद सुरू झाला आहे. मनसेने मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करून अशी सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपला दिला आहे. त्यानंतर आता आज दादरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी करून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या बॅनरवर, ‘ ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती.. तोडत नाही, भाषा जोडते! साऱ्या देशांशी संवाद, महाराष्ट्र देतो साद!’ असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button