TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार जिंकले, अध्यक्षपद मिळालं

अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून अजितदादांचा गट आपल्या भाजपा या मित्रपक्षाशी चर्चा करत होता. दरम्यान, आता या चर्चेतून तोडगा निघाला असून अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्य अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे. एकूण 31 सदस्य संघटनांपैकी 22 संघटनांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा –  इस्रो प्रक्षेपित करणार सर्वात मोठा उपग्रह; भारताच्या अंतराळ संशोधनाला मिळणार नवी दिशा

31 पैसी 22 पेक्षा जास्त संघटनांचा अजित पवार यांना पाठिंबा
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे(MOA) अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. 31 सदस्य संघटनांपैकी 22 पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक न होता त्या पदावर विराजमान झाले.

मुरळीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे दिली जाणार
ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले. त्यानंतर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. या निवडणुकीतून अजितदादा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ते क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.

अजितदादांवर दाखवला विश्वास
राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात अजित पवार यांचा दीर्घ अनुभव आणि बेरजेचे राजकारण व यामुळे सर्व पक्ष आणि हितसंबंधी संस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकत्रित विश्वास दाखवला. राज्यातील क्रीडा आस्थापनांचे सशक्तीकरण, खेळाडू कल्याण आणि पारदर्शी व्यवस्थापन या अजितदादांच्या जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत त्यामुळे अजित दादांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या कार्यकारिणीसमोर राज्यातील खेळाडू घडविणे, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनविण्याची जबाबदारी असेल.

भाजपाने निवडणुकीत घेतली होती उडी
दरम्यान, याआधीही ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा अजित पवार यांच्याकडेच होती. यावेळी मात्र ही सूत्रं आपल्याकडे घेण्यासाठी भाजपाने या निवडणुकीत उडी घेतली होती. मुरलीधर मोहोळ यांनी चांगलाच जोर लावला होता. परंतु अध्यक्षपदासाठी अजित पवार यांनीदेखील आपल्या पातळीवर हालचाली सुरू केल्या होत्या. शेवटी महायुतीतील भाजपासोबत वाटाघाटी करण्यात अजित पवार यशस्वी ठरले. आता काही पदं मुरलीधर मोहळ यांच्या गटालाही दिली जाणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button