पिंपरी / चिंचवडपुणे

वाकडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पिंपरी l प्रतिनिधी
वेश्या व्यवसाय चालवून त्यावर आपली उपजीविका भागवणा-या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) दुपारी पावणे पाच वाजता व्हिजन वन मॉल, वाकड येथे करण्यात आली.

सुरजकुमार गोविंदबहादूर सिंह (वय 26, रा. व्हिजन वन मॉल, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस हवालदार सुषमा कांबळे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरजकुमार याने व्हिजन वन मॉल येथे सॅनटोना केरला आयुर्वेदिक स्पा नावाने स्पा सेंटर सुरु केले. तिथे त्याने तीन महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून आलेल्या रकमेतून त्याने आपली उपजीविका भागवली. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात आरोपी सूरजकुमार याला अटक करून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button