पिंपरी / चिंचवड

कोयाळी गावात दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

पिंपरी l प्रतिनिधी

खेड तालुक्यातील कोयाळी गावात भीमा नदीच्या काठावर सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल अडीच लाखांचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी अडीच वाजता करण्यात आली.

कपिल गब्बर राजपूत (रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी गावात भीमा नदीच्या किनारी आरोपी कपिल याने हातभट्टी दारूची भट्टी लावली आहे. तो हातभट्टीची दारू तयार करून ती चोरून विकत आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई सागर जैनक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता दारूभट्टीवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी कपिल हा पळून गेला.

गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तीन हजार लिटर रसायन आणि दोन हजार लिटर कच्चे रसायन असा एकूण अडीच लाख रुपयांचा साठा पोलिसांनी नष्ट केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button