breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पेन्शन संघर्ष समितीचा मोर्चा मुलुंडमध्ये पोलिसांनी अडविला

ठाणे | प्रतिनिधी 
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी भिवंडीतील पडघा येथून निघालेला जुनी पेन्शन संघर्ष समितीचा लॉंगमार्च काल, गुरुवारी ठाण्यात पोहोचला. त्यानंतर आज, शुक्रवारी मोर्चेकरी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने विधानभवनावर धडकणार होते. मात्र या मोर्चेकरांना पोलिसांनी ठाणे आणि मुंबईच्या सीमेवरील आनंदनगर चेकनाका येथे अडवले. मुंबईत जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पायी पुढे जाण्यास मनाई केली. मात्र यावेळी पोलिसांनी केलेल्या सूचना न जुमानता आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट्स पाडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलुंड नवघर पोलिसांनी कठोर पावले उचलून २०० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समितीकडून गेल्या तीन दिवसांपासून लॉंगमार्चला सुरुवात झाली. या समितीमध्ये राज्यातील विविध ठिकाणांवरून महसूल, आरोग्य, तलाठी, शिक्षणसह विविध विभागातील शंभरहून अधिक संघटनांचे सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबईत जमावबंदी सुरू असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना पायी न जाता बसने मुंबई येथील आझाद मैदान येथे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र आंदोलनकर्ते पायी लॉंगमार्च करून जाण्यासाठी ठाम होते. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड येथील नवघर पोलिसांनी दोनशेहून अधिक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित आंदोलनकर्त्यांना आंदोलन संपवून घरी जाण्यास सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button