breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

दुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई

दुबई | 

दुबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महिलांच्या एका ग्रुपवर कारवाई केली आहे. शहरातील एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये काही महिला नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. युनायटेड अरब अमिरातीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळण्यासंदर्भातील नियमांमध्ये नग्नता आणि कायदेबाह्य वर्तन या गुन्ह्यांच्या समावेश आहे. या प्रकरणी कोणी दोषी अढळल्यास सहा महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिऱ्हाम्स म्हणजेच जवळजवळ एक लाख रुपये दंड शिक्षेची तरतुद आहे. याप्रमाणे पॉर्नोग्राफिक गोष्टी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शेअर करणंही युएईमध्ये गुन्हा आहे. देशामध्ये इस्लामिक कायद्यांनुसार शिरिया कायदे लागू करण्यात आले आहेत. अश्लील साहित्याची देवाणघेवाण करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणी या महिलांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता मेट्रो या इंग्रजी वेबसाईटने व्यक्त केलीय.

शनिवारी उशीरा दुबईमध्ये असाच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक डझनहून अधिक महिला बाल्कनीमध्ये नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचे दिसत आहे. दुबईतील मरिना येथील एका उंच इमारतीमधील हा व्हिडीओ आहे. दिवसाढवळ्या हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं किंवा परवाना नसताना दारुचं सेवन करणंही गुन्हा असणाऱ्या देशामध्ये असा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. द नॅशनल या सरकारी वृत्तपत्राने हा व्हिडीओ एक पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हटलं आहे. मात्र याबद्दलची अधिक माहिती वृत्तपत्राने दिलेली नाही.

वाचा- लॉकडाउनला पुणेकरांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचाच विरोध; पण…- उपमुख्यमंत्री अजित पवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button