breaking-newsआंतरराष्टीय

PNB घोटाळा: कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रकरणाची आता सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते.

ANI

@ANI

Enforcement Directorate: Fugitive diamond merchant Nirav Modi arrested in London, to be produced in court later today.

७७६ लोक याविषयी बोलत आहेत

वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर नीरव मोदीला कधीही अटक केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये ऐषोरामी जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button