breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘पीएमसी केअर’ यंत्रणा पालिकेने त्वरित सुधारावी

पुणे | प्रतिनिधी 

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अथवा महापालिकेने सुरू केलेल्या ‘पीएमसी केअर’ या यंत्रणेद्वारे काही अपवाद वगळता प्रत्यक्ष कार्यवाही न होताच समस्या बंद करण्यात आल्याचेच उत्तर दिले जाते. मूळ समस्या मात्र, कायम राहत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध केल्यानंतर अनेक नागरिकांनी याबाबतच्या प्रतिक्रिया नोंदवून पालिकेने या यंत्रणेत त्वरित सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.

दैनंदिन जीवनात पाणीपुरवठा बंद असणे, जलवाहिनी फुटणे, मलवाहिनी तुंबणे, भटक्या जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अनधिकृत बांधकामे, अडथळे, खड्डे, पदपथ, बसथांब्यांची दुरवस्था अशा विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. अनेकदा नगरसेवकांच्या माध्यमातून या समस्या मार्गी लागतात. परंतु, काही नागरिकांना नगरसेवकांची मदत घेता येत नाही किंवा त्यांची मदत न घेता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून समस्या सुटावी, अशी त्यांची मागणी असते. त्यासाठीच पीएमसी केअर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, भोंगळ कारभारामुळे नागरिकांना या सुविधेचा काहीही फायदा होत नसल्याची व्यथा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली होती. त्यावर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘आपल्या तक्रारीबाबत वारंवार पाठपुरावा करावा लागतो. तरच काहीतरी काम होते,’ असे बावधन येथील रहिवासी मंदार दिवाकर यांनी सांगितले.

“पीएमसी केअर’ ही यंत्रणाच रामभरोसे आहे. टोकन क्रमांक दिल्यानंतर काही अंतर्गत संदेशांची देवाण-घेवाण होते. अपेक्षित पूर्तता दिनांक दिला जातो नंतर काहीही कार्यवाही न होताच तक्रार बंद होते. यदाकदाचित समस्या सुटलीच; तर तक्रारकर्त्याला कळवलेही जात नाही,’ असा अनुभव हेमंत बोरकर यांनी नोंदवला. ‘कारवाई किंवा कार्यवाही न करताच दरवेळी तक्रार बंद केली जाते. भटक्या कुत्र्यांसंदर्भात केलेल्या तक्रारीसाठी कालची पूर्तता तारीख असताना आज ‘पेंडिंग’ असे दाखवले जात आहे. उद्या ही तक्रार बंद केली जाईल,’ असे अभिषेक सोमवंशी यांनी नमूद केले. “पीएमसी केअर’वर आलेल्या किती तक्रारी सोडवल्या गेल्या याची माहिती दिली म्हणजे खरे काय ते समजेल,’ अशी मागणी अॅड. सुनील कोरपडे यांनी केली आहे. ‘पीएमसी केअर’ अधिकृतरीत्या कुठेच अस्तित्वात नाही. महापालिकेकडून तक्रार निवारण केल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात काहीच होत नाही,’ असे हेमंत आठल्ये यांनी सांगितले.

  • पन्नासहून अधिक तक्रारींकडे दुर्लक्षच

‘सोपानबाग रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने मी ‘पीएमसी केअर’वर जवळपास ५० हून अधिक तक्रारी नोंदवल्या. त्यावर टोकन नंबर दिले गेले. परंतु, त्यातील एकही तक्रार आजवर सोडवली गेलेली नाही. नगरसेवकांनी महापालिका भवन अथवा क्षेत्रीय कार्यालयाला सांगितले तरच काम होते. महापालिका प्रशासनात सर्वसामान्य नागरिकांना काहीही किंमत नाही. महापालिका आयुक्तच सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास असून, ते ‘पीएमसी केअर’चा कारभार नक्की सुधारतील, अशी आशा आहे,’ असे सोपानबाग येथील रहिवासी आणि असोसिएशनचे निमंत्रक सचिन खंडेलवाल यांनी सांगितले. महत्तवाचा लेखखरबुजाच्या मागणीत वाढ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button