ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नियोजन समितीची निवडणूक, राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांना सर्वाधिक मते

पिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी विजयी झाले. विजयी होण्यासाठी 12 मतांची आवश्यकता होती. गव्हाणे यांना 14 मते मिळाली. मतांच्या कोट्यापेक्षा 2 मते त्यांना जास्त मिळाली. पीएमआरडीएच्या माध्यमातून शहरालगतच्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद गव्हाणे यांनी भूषविले आहे. नगरसेवकपाची त्यांची चौथी टर्म आहे. पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी मोठे नागरी मतदार संघात (पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका) या गटातून गव्हाणे निवडणुकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याचा आज निकाल जाहीर झाला. विजयी होण्यासाठी 12 मतांचा कोटा होता. अजित गव्हाणे यांनी सर्वाधिक मते घेतली. त्यांना 14 मते मिळाली. मतांच्या कोट्यापेक्षा 2 मते त्यांनी जास्त घेतली. तर, सत्ताधारी भाजपच्या निर्मला गायकवाड यांनाही 14 मते मिळाली. भाजपचे वसंत बोराटे यांना 13, नामदेव ढाके यांना 12, संदीप कस्पटे 12, जयश्री गावडे 12, चंद्रकांत नखाते यांना 10 मते मिळाली.

नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ”पीएमआरडीए पहिल्यांदाच सुरु होत आहे. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनी मतदान केले. यापूर्वी टाऊन प्लॅनिंग होते. आता पीएमआरडीएच्या माध्यमातून शहरा लगतच्या गावांचा विकास केला जाणार आहे. नियोजितपणे विकास करण्याचा पीएमआरडीएचा मानस आहे. त्यातून शेतकरी आणि नागरिकांना फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला निधी कमी असतो. आता पीएमआरडीएच्या माध्यमातून दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध होतील. पीएमआरडीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध विकास केला जाईल”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button