पिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रोच्या साईटवरून पाइपची चोरी; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी l प्रतिनिधी

महामेट्रोच्या कासारवाडी येथील साईटजवळ ठेवलेले हजारो रुपयांचे पाईप चोरून नेताना दोघांना पकडण्यात आले आहे. ही घटना कासारवाडी येथे अल्फा लावल कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर बीआरटी मार्गावर रविवारी (दि. 2) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बसवराज माधव टोपारे (वय 37, रा. माण खुर्द, ता. मावळ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन बबन कापसे (वय 33, रा. वैशाली नगर, पिंपरी), दादासाहेब बापुराव कोल्हे (वय 37, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महामेट्रोमध्ये साईट सुपरवायजर म्हणून नोकरी करतात. कासारवाडी येथे अल्फा लावल कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर बीआरटी मार्गावर मेट्रोच्या कामासाठी बिल्डींग मटेरियलचे साहित्य ठेवले आहे. त्यातील पाच हजार 600 रुपये किमतीचे सात लोखंडी लेजर पाईप रविवारी सकाळी आरोपी चोरी करुन नेत होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button