Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“हे केवळ राजकीय डावपेच, मी घाबरणार नाही”; माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे

कार्यलय अतिक्रमण प्रकरण : ज्येष्ठ नागरिकांच्या वर्गणीतून उभारले विरंगुळा केंद्र

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या सेक्टर २९ मधील जागेवर अनधिकृतपणे कार्यालय बांधल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आरोप हेतुपुरस्सर राजकीय सूडातून करण्यात आल्याचा ठपका खुद्द भोंडवे यांनी ठेवला आहे.

भोंडवे म्हणाले, “जागा दोन एकर असल्याचे सांगितले जात आहे, प्रत्यक्षात ती केवळ एक एकर आहे. प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला जागा हस्तांतरित झाली होती. जागेवर पंधरा फूट खोल खड्डे होते. नागरिकांच्या वर्गणीतून ते भरले. बजेट नसल्यानेच आम्ही स्वतः पुढाकार घेतला.” तसेच, “हे कार्यालय माझे खासगी नाही. विकास नगर, वाल्हेकर वाडी, माऊली, तीर्थरूप, सिलेस्टिल सिटी येथील सुमारे साडेपाचशे ज्येष्ठ नागरिकांचे हे कार्यालय आहे. रोज योग, चित्रकला, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. पावसात किंवा उन्हात बसायला जागा नव्हती म्हणून पत्र्याचे शेड उभारले,” असे भोंडवे यांनी स्पष्ट केले.

रोज सकाळी सुमारे शंभर ते दीडशे ज्येष्ठ महिला आणि पुरुष योगाभ्यासासाठी येथे उपस्थित राहतात. संध्याकाळच्या वेळेत झुंबा डान्स क्लास, चित्रकला वर्ग, भजन-कीर्तन आणि अध्यात्मिक प्रवचन असे अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या परिसरात दुसरे कुठलेही सार्वजनिक मैदान उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हेच एकमेव ठिकाण झाले आहे. त्यामुळे येथे बॅडमिंटन, फुटबॉलसारखे खेळही खेळले जातात आणि परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याचे व विरंगुळा मिळवण्याचे हक्काचे स्थान म्हणून या केंद्राचा उपयोग होतो.

हेही वाचा     :      ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका लागणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महापालिकेच्या मंजुरीचे दस्तऐवज उपलब्ध

विरंगुळा केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेले दोन पत्र्याचे शेड आणि ज्येष्ठांचे कार्यालय हे पूर्णपणे अधिकृत असून, त्यासाठी आवश्यक असलेले प्लॅन सॅक्शनचे कागदपत्रे महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेले आहेत, अशी माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या शेड आणि ज्येष्ठांचे कार्यालया च्या अनधिकृततेबाबत काही ठिकाणी अपप्रचार केला जात असल्याचे लक्षात आले असून, संबंधित सर्व बांधकामे महानगरपालिकेच्या अधिकृत मंजुरीनुसारच करण्यात आलेली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत महापालिकेला दिली आहे. स्थानिक नागरिकांनी या सुविधांमुळे सार्वजनिक उपक्रमांना मोठा हातभार लागल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

“आठवडा बाजार अधिकृत”

“या ठिकाणी आठवडा बाजार अनधिकृत नाही. तो महानगरपालिकेत नोंदणीकृत आहे. नागरिकांच्या गरजेसाठी सुरू ठेवला जातो.” या प्रकरणाला राजकीय हेतू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “ज्यांनी आरोप केले, ते काही दिवसांपूर्वीच माझ्या वाढदिवसाला बुके घेऊन आले होते. मी या प्रभागातील साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतो. ते बघवत नाही म्हणून हे आरोप होत आहेत,” असा आरोपही भोंडवे यांनी केला आहे.

“सत्यासमोर कोणी उभं राहू शकत नाही”

भोंडवे म्हणाले, “ज्यांनी आरोप केले, त्यांनी कोणताही पुरावा सादर करावा. ही जमीन माझ्या वैयक्तिक वापरासाठी घेतल्याचा एकही पुरावा दाखवावा. मग आम्हीही विचार करू. अन्यथा हे सर्व राजकीय डावपेच आहेत.” मानहानीची कारवाई करणार का, यावर त्यांनी “सध्या बोलणार नाही, मात्र योग्य वेळ आली की निर्णय घेऊ,” असेही स्पष्ट केले.या बातम्यांमुळे कार्यालयाशी जोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. “वर्षानुवर्षे आम्ही वर्गणी काढली, आता कोणी राजकारणासाठी हे पाडायचा डाव मांडतोय,” असे एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले. आणखी एक सदस्य म्हणाले, “हे आमच्या आयुष्याचा आधार आहे. आम्हाला कुठे बसायचे?”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button