ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सप्तर्षी फाउंडेशनचा शीतऋतू संरक्षण अभियानातून माणुसकीचा स्पर्श

पिंपरी | नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत सप्तर्षी फाउंडेशनच्या वतीने ‘सप्तर्षी शीतऋतू संरक्षण अभियान’ राबविण्यात आले. थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी समाजातील गरजू, निराधार, रस्त्यावर राहणारे बांधव व कुटुंबियांना ३१ डिसेंबर २०२५ रोजी मोफत ब्लॅंकेट वाटप करून मायेची ऊब देण्यात आली.

हा उपक्रम मानवतेच्या भावनेतून गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे राबविला जात असून दरवर्षी शेकडो गरजूंना त्याचा लाभ मिळतो. यंदाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माणुसकीचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या सामाजिक कार्यासाठी नकुल डेअरीचे मालक किरण गवारे, गोल्डन प्रिंट हाऊसचे संचालक प्रवीण सोनगावकर, उद्योजक कपिल सांगोले, निसार मुलानी, निशांत गौर, उद्योजक प्रमोद देवकाते, उद्योजक स्वामी दीक्षित, निलेश जहागीरदार, महालक्ष्मी कलेक्शन आणि न्यू भारत कलेक्शन यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा     :         पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : अंतिम उमेदवारांची यादी जाहीर

उपक्रमांतर्गत
▪ मातृसेवा सेवाभावी संस्था – निराधार निवारागृह
▪ झुंज दिव्यांग संस्था – दिव्यांग युवक निवासी केंद्र
▪ पिंपरी–चिंचवड परिसरातील रस्त्यांवर राहणाऱ्या व्यक्ती व कुटुंबे यांना मोफत ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

या वेळी सप्तर्षी फाउंडेशनच्या वतीने प्रवीणजी तुपेरे, निवृत्त पोलीस अधिकारी विश्वास पवार आणि मनोज बोरसे उपस्थित होते. नवीन वर्षाची खरी सुरुवात माणुसकीनेच होते, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button