शहरातील डेंग्यची रुग्णसंख्या पोहचली बारावर
डासोत्पत्ती स्थानधारकांकडून सव्वा दोन लाखांचा दंड वसूल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली असून, ती आता 12 वर पोचली आहे. त्यापैकी एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.तर अॅक्शन मोडवर आलेल्या वैद्यकीय विभागाने शहरातील डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र केली आहे.
महापालिकेच्या किटकनाशक आणि औष्णिक धुरीकरण विभागाच्या वतीने 1 ते 9 जुलै या कालावधीत केलेल्या तपासणीत शहरातील विविध ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने 53 जणांवर डास उत्त्पत्ती स्थानांची निर्मिती या शिर्षकाखाली दंड प्रमाणांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – Important news: जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!
तसेच 467 विविध आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये एकूण 2 लाख 44 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
तपासणी पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून एकूण 42 हजार 51 घरे तसेच 246 बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 889 घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळल्या.
तसेच या पाहणीदरम्यान 141 टायर, पंक्चर भंगारांची दुकाने, 1 लाख 94 हजार 666 कंटेनर्सचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 10 कंटेनर्समध्ये डासांच्या आळ्या आढळल्या होत्या. या ठिकाणी योग्य ती डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.