ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शहर अभियंता पदाच्या विविध विभागांच्या कार्यभाराचे तात्पुरता स्वरूपात वाटप

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम हे महापालिका सेवेतून २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंता निकम यांच्या कडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरूपात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, याबाबतचे आदेश आज निर्गमित केलेले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या पाणी पुरवठा व प्रकल्प विभागासह स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा      :              अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

सह शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी दळणवळण या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

तसेच सह शहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या विभागासह बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button