Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
इंडो ॲथलेटिकच्या सात सायकलपटूंची नाशिक फाटा ते शेगावपर्यंत वारी

पिंपरी : राष्ट्रभक्ती, अध्यात्म, संस्कृती आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संगम साधत, इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सात सायकलपटूंनी पुणे ते शेगाव ही ४५० किमी लांब पल्ल्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
शेगाव येथे पोहोचल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. फुगेवाडी येथील मोहीम नाशिक फाटा येथून सुरू झाली. सलग तीन दिवसीय मोहीम दरम्यान पुणे-वाघोली-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर-सिंदखेड राजा-चिखली व खामगाव मार्गे शेगाव, असा प्रवास झाला.
तरुण पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करणे, हा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत गिरीराज उमरीकर, अजित पाटील, श्रीकांत चौधरी, प्रशांत तायडे, सुशील मोरे, अनुप कोहळे आणि प्रतीक पवार होते.




