विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना उमगले ‘विज्ञान’
शिक्षण विश्व: एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विज्ञानाच्या अविष्कारांची माहिती घेतली.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग नाना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे संचालक नितीन लोणारी, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, उपमुख्यद्यापिका नेहा खांडेकर उपस्थित होते. पालकांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. शाळेतील इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली. यासाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.
हेही वाचा : ..म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
अध्यक्ष पांडुरंग गवळी म्हणाले, विज्ञान दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान व वैज्ञानिक उपक्रमांबद्दल आकर्षित व सतर्क करण्याचा आहे. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली.