सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पिंपरी : सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांची नियंत्रण कक्षात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे.
सांगवी पोलिस स्टेशनच्या समोर बुधवारी रात्री पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांचा बर्थ डे सेलिब्रेशन मोठ्या जल्लोषात करण्यात आला होता. यावेळी ड्रोनद्वारे चित्रीकरण, फटाक्यांची आतिषबाजी, फायर शो करत वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.
हेही वाचा – मावळात पवना धरण परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
या बर्थडे सेलिब्रेशन प्रकरणी सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे निलंबन केले आहे. तर सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांची नियंत्रण कक्षात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे.
आता बर्थडे सेलिब्रेशनचं जंगी आयोजन करणाऱ्यांवर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होणार का? याकडे देखील पिंपरी चिंचवड वासियांचंचे लक्ष लागले आहे.